काशिफ खानला ओळखत नाही, पार्टीचं निमंत्रण होतं, पण मी गेलो नाही – अस्लम शेख

2

मुंबई: राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांना कार्डिलिया क्रुझवर नेण्यासाठी आग्रह केला जात होता, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी खळबळ उडवून दिली होती. त्यावर आता  पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज  पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.

अस्लम शेख म्हणाले की, मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावं, असा खुलासा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला.

काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही. त्याने मला पार्टीला बोलावलं होतं. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहीत नाही. माझा मोबाईल पीएकडे असतो. तो एका ठिकाणी मला भेटला होता. तो तिथे कसा आला मला माहीत नाही. त्याने मला भेटून पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. आता त्या पार्टीत काय होणार होतं. मला माहीत नाही. हे तपास यंत्रणेने शोधावं. काशिफशी फोनवर संभाष झालं नाही. संभाषण झाल्याचं मला आठवत नाही. त्याने भेटून आमंत्रण दिलं होतं हे मात्र नक्की, असं त्यांनी सांगितलं.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.