चिखलात कोण लोळतंय अन् चिखलफेक आधी कोणी केली हे जनता जाणते – संजय राऊत

11

मुंबई: ज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नोटबंदीमध्ये बनावट नोटांचे रॅकेट चालवण्याचे तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक आरोप केले आहेत. मलिक यांच्या या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचचं ट्विट केलं आहे. डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे, असा घणाघाती हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर केला होता.

यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. चिखलात कोण लोळतंय आणि चिखलफेक आधी कोणी केली हे सर्व जनता जाणते, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांनी बुधवारी प्रख्यात लेखक-नाटककार जॉर्ज बर्नाड शॉ यांचं एक वाक्य ट्विट केलं. यावर बोलताना आम्ही बर्नाड शॉ नाही, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर वाचतो. आम्ही आपलं मराठी साहित्य वाचतो.

बर्नाड शॉ आम्ही अधूनमधून चाळत असतो. बर्नाड शॉचा दाखला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ठिक आहे. महाराष्ट्राला वाचण्याची फार मोठी परंपरा आहे. इंग्रजीमधले बर्नाड शॉ फार मोठे लेखक नाटककार होते. यानिमित्त आपले लोक वाचायला लागलेत. त्याचं स्वागत आणि कौतुक करायला हवं, असं म्हणत यामुळे नाशिक मध्ये होणारं साहित्य संमेलन अधिक भारदार होईल, असा टोला राऊत यांनी मलिकांना लगावला.

चिखलात कोण लोळतंय, चिखल कोण फेकतंय, आणि चिखलफेकीची सुरुवात कुठून झाली हे सर्व या राज्याची जनता जाणते. बुधवारी कॅबिनेटमध्ये मुखंयमंत्र्यांनी नवाब मलिकांना पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यामुळे, संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांच्या पाठिशी उभं राहिल्यामुळे नवाब मलिकांच्या लढाईला नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे. हे जे सुरु आहे त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे की नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय. म्हणून मी काल म्हणालो की हे किती काळ चालणार आहे. शेवटी एक सांगतो की सत्याचाच विजय होणार आहे, सत्य आमच्या बाजूने आहे, असं राऊत म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.