कंगनाला थोडी लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी – संजय राऊत

25

मुंबई: “भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात केले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत आणि भाजपावर निशाणा साधला आहे. “कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने थोडी जरी लाज लज्जा असेल तर देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत,” असे राऊत यांनी म्हटले. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावरून देखील त्यांनी केंद्राला टोला लगावला आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सीबीआय, इडी, आयकर विभाग अशा पद्धतीने धाडी टाकत आहेत, जसे की ते भाजपाचे नोकर असावेत. मात्र परिस्थिती बदलनार 2024 नंतर हेच शस्त्र तुमच्यावर उलटणार, सध्या राज्यात काय सुरू आहे हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे.

2024 जनता तुम्हाला तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी नवाब मलिक यांची देखील पाठराखन केली. मलिक यांना मुख्यमंत्र्यांनी पाठिंब दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे, त्यामुळे या लढाईत मलिक एकटे नसल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. भाजपा नेते वरून गांधी यांनी देखील कंगनावर टीका केली आहे.  कंगनाने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की,  “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान होतो, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर होतो, आतातर शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार होतोय. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?”, असा घणाघात त्यांनी केला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.