वरळी येथे बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट; ४ जण जखमी

7

मुंबई: वरळीत आज, मंगळवारी सकाळी ७.११ वाजताच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. येथील कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. यात चार जण होरपळून जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी येथील कामगार वसाहत येथील बीबीडी चाळ क्रमांक ३ मध्ये एका घरात आज, मंगळवारी सकाळी ७.११ वाजताच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर घराला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि पोलीस तसेच वॉर्डातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाकडून सकाळी ९.४४ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे.

या गॅस सिलिंडरच्या स्फोटात आनंद पुरी (२७) आणि मंगेश पुरी (४ महिने) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर विद्या पुरी (२५) आणि विष्णू पुरी (५) हे दोघेजण जखमी असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. या चौघांवर महापालिकेच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.