विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटेंचे नाव निश्‍चित!

1

मुंबई: विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदा संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

कोण आहेत संग्राम थोपटे

संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे. सर्वाधिक चर्चेतील आमदार म्हणून संग्राम थोपटे यांना ओळखलं जातं. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार म्हणून आलेले आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून भोर विधानसभा मतदारसंघावर थोपटे कुटुंबाची सत्ता आहे. संग्राम थोपटे यांनी मतदारसंघात अनेक विकासाची कामे करून मतदारसंघावर पकड कायम ठेवली आहे. अत्यंत कमी वयात राजकारणात पाऊल ठेवल्यानंतरही त्यांनी राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.