काय बाई सांगू? कसं गं सांगू, म्हणत फिल्मी स्टाईलमध्ये शिवेंद्रराजे यांच्यावर उदयनराजेंची बोचरी टीका

17

सातारा: भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे त्यांची स्टाईल आणि डायलॉगबाजीमुळे नेहमीच चर्चेत असतात. खास करुन कॉलर उडवत केलेली डायलॉगबाजी आणि गाण्याठी यापूर्वीही उदयनराजे चर्चेत राहिलेत. पुन्हा एकदा उदयनराजेंचा हाच अंदाज साताऱ्यातील एका कार्यक्रमात दिसून आला. गुरुवारी सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपमध्येच असलेले त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर फिल्मी स्टाईलमध्ये टिका केली. उदयनराजेंनी “काय बाई सांगू? कसं गं सांगू मलाच माझी वाटे लाज. काहीतरी मला झालंय आज”, असं म्हणताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

सातारा जिल्ह्यामध्ये भाजपाचे राज्यसभेवरील खासदार उदयनराजे भोसले यांची आणि राष्ट्रवादीतील नेत्यांशी वाद नेहमीच चर्चेत राहतात. मात्र, त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी होत असलेले तुतुमैमै लक्षवेक्षक असते. त्याचा प्रत्यय सध्या सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये होत असलेल्या शाब्दिक वादाच्या सत्रावरुन येत आहे.

सातारा पालिकेची नूतन प्रशासकीय इमारती जिल्हा परिषदेमोरील कॅम्प सदरबझार येथे उभी राहत आहे. या इमारतीचे भूमीपूजन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक किशोर शिंदे, वसंत लेवे, राजू भोसले, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, सुहास राजेशिर्के, सुनील काटकर, माजी नगराध्यक्षा रंजना रावत आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, आम्ही कामे करतो म्हणूनच नारळ फोडतो. तुम्ही समोरासमोर चर्चेला कधीही या मी तयार आहे,’ असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता दिले. खा. उदयनराजे म्हणाले, ‘कोण काय म्हणतंय याच्याशी मला काहीच घेणं नाही. सातारकरांच्या पाठबळावर मी ठाम असून भविष्यातही मी आपल्या सेवेत रुजू आहे. सातारकर माझं हृदय आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आजवर जर मी काही कमवलं असेल तर ते पैसे नाही तर तुमचं प्रेम आहे. ते मी गमावणार नाही. टीका करणारे करतील पण जे काम करतात तेच नारळं फोडतात. चर्चेला याल तर धाडस ठेवा, असे आव्हानं त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.