नितेश राणेंना शोधून द्या आणि मिळवा एक कोंबडी बक्षीस, गिरगावातील भाजप कार्यालयासमोर बॅनर

2

मुंबई: संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जामीन फेटाळल्यानंतर कोकणात तसेच कणकवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तर दुसरीकडे जामिनासाठी आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठवू अशी माहिती नितेश राणे यांच्या वकिलांनी दिली असून त्यांचा ठावठिकाणा अजूनही कोणाला लागलेला नाही.

पोलीस त्यांचा शोध घेतच आहेत. या पार्श्वभूमीवर गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहण्यात आलीय. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल असंही लिहण्यात आलंय.

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जामिनासाठी त्यांना आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. त्यामुळे अजूनही राणे अज्ञातवासात आहेत. ते नेमके कोठे आहेत. त्यांच्या ठावठिकाणा काय ? याची अजूनही कोणाला माहिती नसून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, आता राणे कुटुंबीयांना डिवचणारे बॅनर गिरगावमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे चक्क गायब असल्याचा दावा करण्यात आलाय. नितेश राणे हरवले असून त्यांना शोधून देणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस दिली जाईल असेदेखील या बॅनरवर लिहण्यात आलंय. या बॅनरमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.