पेट्रोल-डिझेलचा भडका; सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ

8

मुंबई: भारतीय तेल कंपन्यांच्या वतीनं आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आज डिझेलचे दर 34 ते 38 पैशांनी, तर पेट्रोलचे दर 30 ते 35 पैशांनी वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या महागाईमुळं आधीच सर्वसामान्य त्रस्त आहेत, अशातच सातत्यानं वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर त्यांच्या चिंतेत आणखी भर घालत आहेत.

देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.59 रुपये, तर डिझेलचे दर 96.32 रुपये प्रति लिटर आहेत. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 113.46 रुपये आणि डिझेलची किंमत 104.38 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 108.11 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 99.43 रुपये प्रति लिटर आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 104.52 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 100.59 रुपये प्रति लिटर आहेत.

एक मेसेज करून आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी इंडियन ऑईलच्या एसएमएस सेवेचा वापर करता येईल. आपल्या मोबाईलवरून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवा लागणार आहे. RSP स्पेस देऊन पेट्रोल पंप डिलरचा कोड टाका आणि मेसेज सेंड करा. RSP कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आपल्या मिळेल.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.