आशिष शेलार सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात म्हणून त्यांना जिवे मारण्याची धमकी – देवेंद्र फडणवीस

23

नागपूर: भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार  यांना कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी देण्यात आली. आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी  देण्यात येते आहे. आशिष शेलार नेहमी सरकार विरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्ट्राचार ते काढत असतात, यामुळेच त्यांना धमकी दिली गेली असावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

धमकी मिळाल्यानंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती शेलार यांनी पोलिसांना केली आहे. २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. शेलार यांनी अनोळखी नंबरवरून धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

आशिष शेलार हे भाजपचे प्रमुख नेते आहे. त्यांना यापूर्वी देखील धमकी मिळाली होती. शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील आणि कारवाई करण्याची मागणी करतील, असं समजते. आशिष शेलार नेहमी सरकारविरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्ट्राचार ते काढत असतात. त्यामुळे त्यांना ही धमकी आली असेल. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.