अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका केल्याने आव्हाड संतापले; म्हणाले….

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे एक नेते तर आहेच तसेच एक अभिनेतेही आहेत. आता ते एका चित्रपटात दिसून येणार आहे. येणाऱ्या चित्रपटात अमोल कोल्हे हे आता नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्यामुळे या चित्रपटावरुन एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.अमोल कोल्हे यांचा चित्रपट Why I killed Gandhi चा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोत ते नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
अमोल कोल्हेंचा हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच याला विरोध होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि गृहनिर्मान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या चित्रपटाचा विरोध केला आहे. यावरून त्यांनी आपल्याच पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाच सुनावले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच यावरून जुंपली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हणलय की डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.
विनय आपटे ~शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022
अमोल कोल्हे यांचा हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दिग्गज नेत्यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांनीही या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रीयेत त्यांनी स्वताची बाजू मांडली आहे. ते म्हणतात २०१७ मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. जेव्हा मी राजकारणात सक्रीय नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी भूमिका साकारतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी १०० टक्के सहमत असतो असे नाही. काही भूमिकांशी आपण सहमत असतो, तर काही भूमिकांच्या विचारधारेशी सहमत नसतानाही आपण त्या भूमिका करतो, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.