चांदी व्यवसायाच्या शासकीय ओळखपत्रांचं कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर  : चांदी व्यवसायासाठी हुपरी मधील चांदी व्यावसायिक देशभर फिरत असतात. या वेळी चांदीचे दागिने घेऊन जात असताना अनेक अडीअडचणींना त्यांना सामोरे जावं लागत होतं, तसंच आपली चांदी व्यावसायिक ही ओळख सिद्ध करण्यासाठी मोठ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागे. चांदी व्यावसायिकांना शासकीय ओळखपत्र मिळावं यासाठी युवा नेते अमित दादा गाट यांनी केंद्रीय मंत्री महोदय ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे या विषयासंबंधित मागणी केली होती, याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
याच गोष्टीचा चंद्रकांत पाटील यांनी त्वरित पाठपुरावा करत या चांदी व्यवसायाच्या शासकीय ओळखपत्रांचं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात वाटप करण्यात आलं. या वेळी सर्व चांदी व्यापारी यांच्यासाठी देशभरात फिरत असताना होणारा त्रास कमी होणार असून ४० वर्षांपासूनचा हा प्रश्न मार्गी लागल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
या वेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, नगराध्यक्षा सौ जयश्री गाट, भाजपा शहराध्यक्ष राहुल चिकोडे, युवा नेते अमित गाट, सुभाष कागले, मुख्याधिकारी विशाल पाटील, क्षितिज देसाई, नगरसेवक सुदर्शन खाडे, सयाजी पाटील, नगरसेवक सचिन गाट, रफिक मुल्ला, श्रीनिवास पालकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुहास जाधव, प्रकाश मुधाळे, सतिश कामिरे, शिवाजी भानसे, उदय शिंदे, धनंजय गाट आदींसह असंख्य चांदी व्यवसायिक उपस्थित होते.