अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे १६ आमदार गैरहजर होते, शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

20

राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.  उद्या या सुनवाणीचा शेवटचा दिवस आहे. आज दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी आज युक्तिवाद करताना म्हटले कि, शिवसेनेच्या ३९ आमदारांसोबत आता माविआच्या १६ आमदारांचाही ठाकरे सरकारवर विश्वास नव्हता असा युक्तिवाद केला.

नीरज कौल यांनी न्यायालयात म्हटले कि, ननवीन सरकार स्थापन करण्यामागे केवळ शिवसेना विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षही सामील होता. माविआ सरकारमधून जरी ३९ आमदार बाहेर पडले नसते किंवा अपात्र ठरले असते तरी ते सरकार कोसळलं असतं.
विधानसभा अध्यक्षपदी निवडीवेळी राहुल नार्वेकर यांच्या निवडीवेळी मतदान घेण्यात आले होते, त्यावेळी मविआचे १६ आमदार गैरहजर होते. शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर पडले नसते किंवा ते अपात्र जरी  ठरले असते तरीही ते सरकार पडलं असतं. करणं अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकस आघाडीचे १६ आमदार गैरहजर होते. कारण त्यांची सरकारवर विश्वास नव्हता.
नीरज कौल यांच्या युक्तिवाद वरून न्यायालयाने म्हटले कि,   दोन्ही गट पक्षातच असले तरी दहावी सूची लागू होईलच कोणत्या गटाकडे बहुमत आहे याने  दहाव्या सूचीच्या तरतुदींवर परिणाम होत नाही . देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले आणि त्यानंतरच ठाकरे सरकारवर विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे निर्देश दिले असं न्यायालयाने म्हटलं.नंतर सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनाच का बोलावलं असा सवालही न्यायालयाने विचारला.

Get real time updates directly on you device, subscribe now.