प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन… वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आज चित्रपट क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली. ज्येष्ठ अभिनेते आणि दिगदर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनयासोबतच कौशिक यांनी अनेक चित्रपटांचे दिगदर्शन केले आहे. मिस्टर इंडिया मधील कॅलेंडर ची भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. यासोबतच दिवाना मस्ताना मधील पप्पू पेजर देखील तिथीचा महत्वपूर्ण भूमिका. त्यांना दोंन वेळा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला. अभिनेते अनुपम खेर याची कौशिक याच्या निधनाची बातमी दिली. सोशल मीडियावर सेलिब्रेटींनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्महाऊसवरून परत येत असताना त्यांना कारमध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनतर त्यांना तेथील नजीकच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी त्याचन्हे पार्थिव मुंबईत आणले जाईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनीं प्रथम नाटकांमध्ये काम केले. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. दिवानं मस्ताना, राम लाखन, साजन चले ससुराल या चित्रपटांमध्ये त्यांचा उत्तर असा अभिनय होता. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023