कोल्हापूर येथील भरारी फाउंडेशनच्या वतीने वंसतोत्सव खरेदी-विक्री प्रदर्शनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर येथील भरारी फाउंडेशनच्या वतीने वंसतोत्सव खरेदी-विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन हे १४ ते १६ एप्रिल २०२३ पर्यंत महालक्ष्मी हॉल एक्सटेंशन येथे भरवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांनी आज सदिच्छा भेट दिली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी प्रदर्शनातील प्रत्येक महिला उद्योजकांच्या स्टॉलवर जावून खरेदी केली आणि उद्योजक महिलांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. तसेच प्रदर्शनातील सर्व स्टॉल मोफतही करुन दिले. हे स्टॉल मोफत झाल्यामुळे महिला उद्योजकांना दिलासा मिळाला आणि उद्योगाला चालना सुद्धा मिळाली, असल्याचे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी भरारी फाउंडेशनच्या संचालिका कु. गायत्री राऊत, सौ. वनिता ढवळे. सौ. दिपिका जाधव, सौ. जया शिंदे, सौ. समृद्धी चौगुले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.