एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

9

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आज चंद्रकांत पाटील यांनी  जिल्ह्यातील कासेगाव आणि हत्तूर मधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने तातडीने सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. यासोबतच पालकमंत्र्यांनी ही बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. त्यानुसार आज सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव आणि हत्तूर मधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देऊन राज्य सरकार त्यांच्याप्रति अतिशय संवेदनशील असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे हत्तुर येथील शेतकरी नागनाथ भोपळे व कासेगाव येथील विक्रम मेटकरी, अजित मेटकरी  यांच्या शेत पिकांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन  चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,  उपसंचालक कृषी राजकुमार मोरे, तहसिलदार  राजशेखर लिंबारे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.