‘अल्टिमेट पिकलबॉल लीग – पुणे एडिशन २०२६’ या भव्य स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

5

पुणे : पुणे येथे अभय भुताडा फाऊंडेशनच्या पुढाकारातून आयोजित ‘अल्टिमेट पिकलबॉल लीग – पुणे एडिशन २०२६’ या भव्य स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी उपस्थित खेळाडू, आयोजक आणि क्रीडाप्रेमींशी संवाद साधत सर्व सहभागी स्पर्धकांना पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास अभय भुताडा फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय भुताडा, अली पुनावाला, प्रशांत बोरा, तस्निम पुनावला, राजेंद्र भिंताडे, स्नेहल दगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, अल्टिमेट पिकलबॉल लीगसारख्या क्रीडा स्पर्धांमुळे खेळाडू, युवा खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. फिटनेस, समुदाय सहभाग आणि सकारात्मक क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमासाठी आयोजक आणि अभय भुताडा फाऊंडेशनचे अभिनंदन करतो. विशेषतः तरुणांमध्ये शिस्त, संघभावना आणि निरोगी जीवनशैली विकसित करण्यासाठी खेळाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. ही स्पर्धा पुढेही क्रीडा आणि सक्रिय जीवनशैलीबाबत अधिक जागरूकता निर्माण करेल, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

अभय भुतडा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले, एक संस्था म्हणून, आम्ही क्रीडा, सामुदायिक सहभाग आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहोत. वेगाने लोकप्रिय होत असलेला ‘पिकलबॉल’ हा खेळ शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देतो; आणि खेळाच्या माध्यमातून शिस्त व एकतेची जोपासना करणाऱ्या या उपक्रमाला पाठिंबा देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

अभय भुतडा फाउंडेशनतर्फे आयोजित, पुणे येथील ‘मसलबार स्पोर्ट्स क्लब’मध्ये होणाऱ्या या दोन दिवसीय स्पर्धेत, भारतभरातून १८० हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून, ते एकेरी आणि दुहेरी गटांत एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.