भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मीताई बागल आणि आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या विविध जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. आज पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत . दरम्यान करमाळ्याचे लोकनेते दिगंबर बागल यांच्या कन्या तथा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मीताई बागल यांची आज त्यांच्या निवासस्थानी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यासोबतच विधानसभेच्या करमाळा-माढा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी देखील सदिच्छा भेट दिली.