पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी संजयकाकांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

21
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेतील माजी सैनिक वसाहत येथे चौक सभा घेऊन मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास निर्माण आहे. लोकसभा निवडणुकीत जनता माननीय मोदीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. तरी, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी संजयकाकांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.
यावेळी मंत्री सुरेश खाडे, संजयकाका पाटील, मोहन वनखंडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.