भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

3

मुंबई :  महाराष्ट्रातील भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. यासाठी  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी य तिघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मुंबईतील विधानभवन येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ.अजित गोपछडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाच्या या तीन नेत्यांसोबतच शिवसेनेकडून मिलिंद देवरा, एनसीपीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे अशा ६ जणांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत या ६ जागांवर नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र या कालावधीत ना कुठले नवे नामांकन आले ना कुणी आपले नाव मागे घेतले. यामुळे या ६ खासदारांची नावे राज्यसभेसाठी बिनविरोध पक्की झाली आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.