डी-नोव्हो विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचा मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत सांगितले.
या विद्यापीठासाठी आवश्यक पदे भरण्यास मान्यता, अध्यापकीय पदांची पदभरती, शिक्षकेत्तर पदभरती, वसतिगृह,याबाबत सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.