शैक्षणिक संस्थांचा वीज खर्च कमी करून स्वच्छ व हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

5

मुंबई : मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाप्रीत (MAHAPREIT) यांच्यात राज्यातील ५७ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनांच्या सौरऊर्जिकीकरणासंदर्भात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत आयोजित आढावा बैठक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत शैक्षणिक संस्थांचा वीज खर्च कमी करून स्वच्छ व हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच ‘Ground-mounted Solar – Open Access’ अंतर्गत चंद्रपूर, अमरावती, धाराशिव, वाशिम, कोल्हापूर, नंदुरबार, आर्वी, बीड, साकोली, जालना व खामगाव यांसह सर्व ५७ संस्थांमध्ये सौरक्षमेचा पूर्ण उपयोग करून ऊर्जा बचत व पर्यावरणपूरक परिसर निर्मितीवर भर देण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या.

या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अमोल मुत्याल, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच महाप्रीत आणि संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.