आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पाठपुराव्याला अखेर यश… एसटी कर्मचाऱ्याला मिळवून दिला न्याय

98

महाड : न्याय आणि हक्कासाठी एसटी प्रशासनाविरुद्ध संपूर्ण परिवारासह महाड आगारात स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाला बसलेले कर्मचारी गजानन मोरे यांची मागणी अखेर एसटी प्रशासनाने मान्य केली असून तसे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. गजानन मोरे यांची बदली परस्पर इतर आगारात करण्यात येत होती. मोरे यांनी महाड आगारातच काम मिळावे यासाठी त्यांनी उपोषण सुरु केले. महाड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार, विधिमंडळ पक्ष प्रतोद,उपनेते भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकारामुळे अखेर त्यांच्या लढ्याला यश आले.

एसटी प्रशासनाकडून गजानन मोरे यांची मागणी सातत्याने धुडकावून लावली जात होती. महाड आगारातच काम मिळावे यासाठी त्यांनी लढा सुरु केला. आमदार भरतशेठ गोगावले यांनी पुढाकार घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. या सर्व घडामोडीनंतर प्रशासनाने अखेर नरमाईची भूमिका घेत मोरे यांना महाड आगारातच शिपाईपदी पुन्हा रुजू करून घेतले आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे. आपली मागणी मान्य झाल्यामुळे मोरे आणि त्यांच्या परिवाराने शुक्रवारी आपले उपोषण अखेर मागे घेतले.

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या भूमिकेमुळेच आपल्याला न्याय मिळाला असे मत मोरे यांनी व्यक्त केले. समस्त शिवसैनिकांचे आणि वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच मोरे आणि त्यांच्या परिवाराने मनापासून आभार मानले.

यावेळी शिवसेनेतर्फे दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, तालुका प्रमुख बंधू तरडे, शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल, शहर संघटक निखिल शिंदे, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मोरे, राजू शिंदे, नंदकुमार सातपुते, रोहन पवार, तुषार महाडिक, पावन नगरकर, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते आणि एसटीचे संबंधित प्रशासकीय अधिकरी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.