शिंदखेडा तालुक्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू – चंद्रकांत पाटील
मुंबई : विकासकामांचे सुवर्ण पर्व म्हणजे महायुती सरकार! याच महायुती सरकारच्या माध्यमातून सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या जामफळ धरण बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.
याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कि या भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने शिंदखेडा तालुक्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, या प्रकल्पामुळे शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहेत. या योजनेस केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून रु.२१२० कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात जवळपास सव्वा लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हा प्रकल्प येथील शेतकऱ्यांना जीवनदान देणारा ठरणार आहे.
गेल्या दहा वर्षांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तसेच राज्यातील महायुती सरकारने अनेक विकास योजना आणल्या आहेत. रस्ते, रेल्वे, विमानसेवा, रुग्णालय, सर्व नागरिकांना 5 लाख रुपयांचा मोफत विमा योजना, अंत्योदय योजनेतंर्गत मोफत धान्य योजना, महिलासाठी मोफत सिलेंडर, शेतकऱ्यांचे वीज बील माफ, मुलींना उच्च शिक्षण मोफत अशा अनेक योजना राज्यातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावत असल्याचेही ते म्हणाले.
याच धर्तीवर धुळ्यात भूमिपूजन झालेल्या या प्रणालीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येईल, या प्रकल्पामुळे या परिसरातील शेतीही सुजलाम सुफलाम होवून येथील परिसरात हरीत क्रांती होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.