धुळ्यात भाजपला ‘धक्का’, अनेक पदाधिकारी – कार्यकर्ते राष्ट्रवादीत

142

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

धुळे जिल्ह्यातील भरत पाटील, भास्कर पाटील, अनंतराव पाटील, बाळू पाटील, कपिल दामोदर, माजी संस्थापक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहर उपाध्यक्ष दिलीप पाटील, राजेंद्र गायकवाड यांसह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, धुळे शहराध्यक्ष विजय वाघ, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, संयोजक प्रशांत भदाणे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!