राजकीय इतिहासात सुवर्णक्षण: सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानावर; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

14

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस एका नव्या विक्रमाची साक्ष देणारा ठरला आहे. राज्याचे लाडके नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या महान नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या गौरवशाली कामगिरीबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन केले असून, हा दिवस राज्यासाठी सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्रजी, तुमची ही गौरवशाली वाटचाल माझ्यासह प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला सुखावणारी आणि अभिमान वाटायला लावणारी आहे. महाराष्ट्राला विकासपथावर अग्रेसर ठेवण्यासाठी तुम्ही घेतलेले अखंड परिश्रम आणि जनतेच्या भल्यासाठी मनाशी धरलेला ध्यास, या सर्वांचाच हा गोड आणि दृश्य परिणाम आहे. फक्त राजकारणावर भर नव्हे, तर खांद्यावर घेतलेली ‘महाराष्ट्र धर्मा’ची पताका आणि सदैव विकासाचा ध्यास हाच त्यांच्या यशाचा मूलमंत्र आहे.

देवेंद्रजींच्या कामांचा, जनसेवेचा धडाका विस्मयकारक आहे. मग शेकडो सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार लोकचळवळ, समृद्धी महामार्ग, राज्यातील गजबजलेल्या शहरांतलं मेट्रोचं जाळं, रस्ते, डबल-डेकर पूल… नावं तरी कशा-कशाची घ्यायची? अगदी थोडक्यात सांगायचं तर देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री म्हणून कारकीर्दीतलं प्रत्येक पाऊल महाराष्ट्राला अधिकाधिक आधुनिक करणारं ठरलं आहे.

त्यांच्या कामाच्या धडाक्याचा गौरव करत मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, देवेंद्रजी, तुम्ही यशाची अशी अनेक नवनवीन शिखरे यापुढेही अत्यंत आत्मविश्वासाने सर कराल, यात माझ्या मनात अजिबात शंका नाही. तुमच्या खंबीर आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वात महाराष्ट्राची चौफेर प्रगती अशीच अविरत सुरू राहील. तुमचा आगामी प्रवास अधिकाधिक गौरवशाली आणि लोककल्याणकारी होवो, हीच प्रभू चरणी प्रार्थना!

Get real time updates directly on you device, subscribe now.