पुणे पदवीधर निवडणूक: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये बजावला मतदानाचा हक्क; पत्नी आणि सासूबाईंचे कोल्हापुरात मतदान

12

पुणे, २३ ऑक्टोबर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील कोथरूडमधील मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सुशिक्षित मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले होते.

पाटील कुटुंबीयांचे कोल्हापुरात मतदान

एकीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात मतदान केले, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी सौ. अंजली पाटील आणि त्यांच्या सासूबाईंनी कोल्हापूर येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. “लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे,” अशी भावना पाटील कुटुंबीयांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केली.

मतदान केंद्राबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “लोकशाही अधिक बळकट आणि प्रगल्भ करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सर्व पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात आपले बहुमूल्य योगदान द्यावे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.