पुण्यात विहिंपचा ‘हिंदू समरसता संगम’ सोहळा संपन्न; अशोकजी सिंघल जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन

9

पुणे : विश्व हिंदू परिषद (विहिंप), पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदू समरसता संगम’ या विशेष व भव्य कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. विविध संप्रदायांचे पूजनीय संत आणि आध्यात्मिक गुरूंच्या वंदनीय उपस्थितीने हा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विहिंपचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन होय. या विशेषांकाच्या माध्यमातून अशोकजी सिंघल यांच्या प्रखर राष्ट्रविचार, संघटनात्मक कौशल्य आणि हिंदू समाजाच्या जागृतीसाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाच्या आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला.

या भव्य समरसता संगमास विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमारजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासह महाराष्ट्रातील व देशातील विविध संप्रदायांचे पूजनीय संत आणि आध्यात्मिक मार्गदर्शक या सोहळ्याला उपस्थित होते. पूजनीय संतांच्या आशीर्वादाने आणि मान्यवरांच्या प्रगल्भ मार्गदर्शनाने हा उपक्रम अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला, अशी भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.