तरुण भारतची पुणे आवृत्ती ही केवळ एक वृत्तपत्र नसून विचारांची, मूल्यांची आणि समाजाभिमुख पत्रकारितेची नवी दिशा ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटील

22

पुणे : पुणे येथे नरकेसरी प्रकाशन, नागपूरच्या दैनिक तरुण भारतच्या पुणे आवृत्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष पू. श्री. गोविंद गिरीजी तसेच रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, तरुण भारतची पुणे आवृत्ती ही केवळ एक वृत्तपत्र नसून विचारांची, मूल्यांची आणि समाजाभिमुख पत्रकारितेची नवी दिशा ठरेल, असा मला विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. ही आवृत्ती निरंतर आणि प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी सर्व पुणेकर कटिबद्ध आहेत, अशी ग्वाही यानिमित्ताने पाटील यांनी दिली.

या प्रसंगी महापौर मंजुषा नागपुरे, नरकेसरी प्रकाशनचे कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक शैलेश पांडे, निवासी संपादक सचिन कापसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.