भाजपा सोशल मीडिया पदाधिकारी नचिकेत कुलकर्णी यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे, ०८ मे २६ : कोथरूडमधील भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते नचिकेत कुलकर्णी यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नचिकेत यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नचिकेत कुलकर्णी हे कोथरूडमधील चंद्रकांत पाटील यांचे स्नेही आणि विद्यार्थी परिषदेपासूनचे जुने कार्यकर्ते अनिल कुलकर्णी (एपीके) यांचे चिरंजीव होते. आपल्या कामाप्रती अत्यंत निष्ठा असलेल्या नचिकेत यांनी भाजपा सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची बाजू समर्थपणे मांडण्याचे काम केले होते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, नचिकेतच्या जाण्याने कुलकर्णी कुटुंबावर आणि आमच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर नचिकेतच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुलकर्णी परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना. आम्ही सर्वजण या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. नचिकेत कुलकर्णी यांच्या निधनामुळे कोथरूडमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.