मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोथरुडमधील सुतारदरा, शिवतीर्थनगर आणि पेठकर साम्राज्य परिसरातील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक विशेष बैठक संपन्न

7

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या कोथरुडमधील निवासस्थानी पुणे महानगरपालिकेचे मुख्य शहर अभियंता आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कोथरुडमधील सुतारदरा, शिवतीर्थनगर आणि पेठकर साम्राज्य परिसरातील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक विशेष बैठक पार पडली.

या बैठकीबाबत माहिती देताना पाटील यांनी सांगितले कि, नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी सुतारदरा भागात ३१५ केव्हीए (KVA) क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाच्या जागेबाबत असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून, ती जागा महावितरणला तातडीने हस्तांतरित करण्याचे निर्देश पुणे महानगरपालिकेला यावेळी पाटील यांनी दिले.

​या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे मुख्य शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू माने, हितेंद्र भिरूड, तसेच डॉ. संदीप बुटाला आणि ॲड. सावनकुमार कानडे आदी अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.