मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई : मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. तसेच प्रलंबित विषय आणि पुढील कार्यवाहीचा संबंधित अधिकारी व राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यासोबतच शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी आणि आवश्यक पुढील उपाययोजनांबाबतही यावेळी सूचना देण्यात आला.
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.