मंत्रालयात २२ व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मधील सुवर्णपदक विजेती आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
मुंबई : मंत्रालयात २२ व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मधील सुवर्णपदक विजेती आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिची आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना तिने दाखवलेले क्रीडाकौशल्य, शिस्त आणि जिद्द अतिशय कौतुकास्पद आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा दिमाखाने फडकला असून, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर स्वस्तिकाने मिळवलेले हे यश राज्यातील युवा खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.
स्वस्तिकाच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा! तिच्या हातून भविष्यातही देशाचा आणि महाराष्ट्राचा गौरव असाच वाढत राहो, अशा सदिच्छ देखील त्यांनी व्यक्त केल्या.