सेवा हीच संघटनेची शक्ती आणि जनकल्याण हाच आपल्या कार्याचा केंद्रबिंदू! – मंत्री चंद्रकांत पाटील

14

मुंबई : मुंबईतील वसंतस्मृती, दादर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक सेवेला समर्पित भाजपच्या ‘सेवा संकल्प अभियान’च्या प्रदेश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत आगामी अभियानाची दिशा आणि कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा झाली.

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील सेवा, विकासाभिमुख नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्याचा गौरव जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प आपण केला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जनसेवेचा विचार पोहोचविताना विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवावेत. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सेवाभावाने आणि सक्रियतेने कार्य करावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.