आमदार विनायक मेटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली हि मागणी

अतिआवश्यक नसलेल्या कामांचा ८ ते १० हजार कोटी रुपयांचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांवर वळविण्यात यावा अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
१५ ते ३१ मार्च २०२० दरम्यान महाराष्ट्रामध्ये विविध विभागांमार्फत अंदाजे ८ ते १० हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणाच्या ऑर्डर निघाल्याची बाब आमदार मेटे यांनी समोर आणत, एकीकडे राज्य कोरोनाच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहे, पोलीस, अनेक सरकारी कर्मचारी, नोकरदार यांचे पगार कपात किंवा २ टप्प्यात देण्यात येत असताना, अतिआवश्यक नसल्यास हा हजारो शेकडो कोटीचा निधी लोकप्रतिनिधींना वितरीत करू नये असे देखील मेटे यांनी म्हंटले आहे.
पहा काय आहे पत्रामध्ये
