दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात – अमेय खापकर
मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमी मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसेनवर खोचक टीका केली आहे.
अमेय खापकर म्हणाले की, षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात, असा सवाल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसेनवर खोचक टीका केली आहे.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरुन मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. “षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात? शिवसैनिक 50 टक्के आसनक्षमतेने गर्दी करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा? दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित झाल्याचं यांना सोयरसुतकही नाही? इतकंच होतं तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहं का खुली केली नाहीत? नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांचा मेळावा राजकीय अजेंड्यापेक्षा मोठा आहे हे यांना लक्षातच येत नाही का?”, असा घणाघात अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर केला आहे.