जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल, तर राज्यातला कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय हे स्पष्ट दिसेल – संजय राऊत

8

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. या ट्विटमुळे संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु संजय राऊत मात्र आपल्या मतावर ठाम आहेत.  काहीही गैर केलेलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडले.

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी  एक मुलीचा फोटो ट्विट केला होता. या फोटोत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचा हा फोटो होता. तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. परंतु या  फोटोमुळे पीडित तरुणीची माहिती समोर आल्यामुळे जोरदार चर्च सुरु झाली. राऊत यांनी ट्विट मध्ये असे नमूद केले आहे कि, देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला , आरोपी मोकाट आहेत., असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केले आहे.

राऊत यांनी या प्रकरणी स्पष्ट केले कि, मी काय चुकलो? या मुलीवर कोयत्याचे वार झाले आहेत, या मुलीची आई माझ्याशी बोलली. तिच्या आईने आक्रोश करत सरकारकडे जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मला इच्छमरणाची परवानगी द्या, अशी मागणी  केली आहे.  पारधी समाजातील हि मुलगी आहे. बार्शीतल्या काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. मी दिल्लीत असताना मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असेल तर मी ज्या माध्यमातून पोहोचवायला हवा, त्या माध्यमातून पोहोचवला आहे असे राऊत यांनी म्हटले.

मी त्या मुलीचं नाव , तिच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी काहीही बोललो  नाही. माननीय मुख्यमंत्री या मुलीचं सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नाक, इतकच म्हटलं. यावर जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल, तर राज्यातला कायदा कोणत्या  पद्धतीने काम करतोय हे स्पष्ट दिसेल. एका खासदारावर , एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो. या राज्याची कायदा सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचतोय ते यातून स्पष्ट दिसतयं , असे राऊत यांनी म्हटले.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.