पुण्यात महाराष्ट्र बँकेवर भर दिवसा दरोडा, लाखोंची रोकड लंपास

2

पुणे: दिवसाढवळ्या पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडोखोरांनी हे कृत्य केलं आहे. सियाज कारमधून दरोडेखोर आले होते. कानटोप्या घालत आलेल्या दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकलाय.

दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत बँकेतील लाखो रुपयांची रोख रक्कम आणि कोट्यवधींचे सोने लंपास केले आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे.

पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बँकेत दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळवून नेलं.

दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटानस्थाळाकडे धाव घेतली. तोपर्यंत दरोडेखोर लंपास झाले होते. मात्र, मिळालेल्या माहितीच्या आधारावर अहमदनगर, पारनेर आणि इतरही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पिंपरखेडला पोहचले आहेत. पुढील तपास सुरु आहे.

 

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.