नवाब मलिकांचे आरोप घाणेरडे आणि खोटे, कायदेशीर कारवाई करणार – समीर वानखेडे

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझ ड्रग पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर गंभीर आरोप केले आहेत.  आपण एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार असल्याचं विधान केलं होतं. त्यातनंतर आता समीर वानखेडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते लवकरच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.

कोरोना काळात सिनेतारकांसोबत वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय हे मालदीवमध्ये होते असा आरोप मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी केलेल्या या आरोपानंपतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. ‘नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले आरोप घाणेरडे आणि खोटे आहेत.

सेवेत रुजू झाल्यापासून मी कधीच दुबईला गेलो नाही. मी माझ्या बहिणीसह मालदीवला गेलो नाही. मी सरकारकडून अधिकृत रजा घेतली आणि माझ्या स्वतःच्या पैशाने माझ्या कुटुंबासह सहलीला गेलो. माझी बहीण स्वतंत्रपणे मालदीवला गेली होती. मलिक वारंवार माझ्या कुटुंबातील महिलांना लक्ष्य करत आहे, ही बाब चुकीची आहे. यासाठी मी लवकरच न्यायालयात दाद मागणार असून कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

 

Read Also :