जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं; चित्रा वाघ यांची टीका
पुणे: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खान यांच्या मुंलाला याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणात आर्यन खानच्या पाठीमागे बॉलिवूडसह राज्य सरकार उभे रहाल आहे. यावरु आता भाजप नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्टिट करत सरकार टीका केली आहे.
काय जमाना आहे..
आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं
तर
जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी @KrantiRedkar वर अभद्र भाषेत टिका सुरू आहेजेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं
क्रांती,महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 23, 2021
चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. “काय जमाना आहे.. आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकरवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे. जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे, असे वाघ यांनी म्हंटले आहे.
नवाब मलिक यांचे समीर वानखेडे यांच्या आरोप
एनसीबीचे झोनल चीफ समीर वानखेडे आणि त्याच्या परिवारावर सुद्धा नवाब मलिक आरोप करत आहेत. समीर वानखडेंचे दुबईतील फोटो नवाब मलिकांनी केले ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिका आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेंचे दुबईतील हॉटेलमधील फोटो काल (21 ऑक्टोबर 2021) ट्विट केले. आपण दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेंनी केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. नवाब मलिक विरुद्ध समीर वानखडे या वादाची मालिका अजूनही सुरूच असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
Read Also :
-
आमच्याकडे तक्रारदार गायब आहेत, तरीही प्रकरण सुरू आहे; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
-
भाजपला मोठा धक्का: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज…
-
मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय
-
माण तालुक्याच्या सुपुत्राला राजस्थानात देशसेवा बजावताना वीरमरण
-
मोठी बातमी! हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार? ‘हे’…