राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळण्यात राऊतांचा घुंगरू सेठ झालाय; चित्रा वाघ यांच्या खोचक टोला

38

मुंबई: राज्यात ऐन दिवाळीत सणामध्ये अहमदनगरमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली. अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात आग दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘फक्त अश्रू ढाळू नका तर ठोस पावले काय उचलणार ते सांगा? असा प्रश्न राऊत यांनी दोन्ही सरकारला केला आहे. त्यांच्या या टीकेवर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

“सर्वज्ञानी नगरच्या आगीचे खापर पण केंद्रावर फोडताहेत. वेंटीलिटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय. आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये. उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय. उदय शेट्टी आणि मजनूमध्ये त्यांचा घुंगरू सेठ झालाय.” असे चित्रा वाघ यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

दरम्यान, डॉक्टर, नर्स यांना बडतर्फ करण्यात सरकार कोणता पुरुषार्थ दाखवत आहे. नगर दुर्घटना ही दुर्देवी घटना आहे. डॉक्टर आणि नर्सला बडतर्फ केले. त्यांचे हे कामच नाही. कारवाई करायची असले, तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आग नियंत्रणाचा समावेश करा. सरकार फक्त खंडणी गोळा करत आहेत. ११ लोकांचे बळी घेऊनही सरकारची भूक शमलेली नाही. एक वर्ष जुनी इमारत असूनही आग कशी लागते? असा सवाल त्यांनी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.