‘आघाडीतील नेते बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्राचा हात आहे’; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

नादेड: ‘महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षांपासून विकास नव्हे तर भ्रष्टाचार करत आहेत. हे सरकार इतकं लबाड आहे की काही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. मी तर असे म्हणेल की, यांच्या बायकोनं मारलं तरी यात केंद्राचा हात आहे असं म्हणतील,’ अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
या सरकारने 2 वर्षात राज्यात केवळ भ्रष्टाचार केला. आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरे दिली. मात्र, या सरकारने गरिबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरू आहे. पाच वर्षात एकाही शेतकऱ्यांचे विजेचे बिल आम्ही सत्तेत होतो तेव्हा कापले नाही. मात्र, या आघाडी सरकारने शेतकर्याना अंधारात ठेवले. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षात शेतकर्याना एक फुटकी दमडीही दिली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केली आहे.
मूठभर धन दांडग्या लोकांचं सरकार आहे, मालदार सेठ सावकार लोकांचे हे सरकार आहे. लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करता येतो. या सरकारने एकेका समाजाची अवस्था काय केली, ओबीसीचे आरक्षण काढले. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षण गेले. हे सरकार केवळ पैसा फेक तमाशा देख वाल्या लोकांचे सरकार असल्याची टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली आहे.
Read Also :
-
नवाब मलिक माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी करतात; समीर वानखेडेंचं आवाहन
-
शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा…
-
पुण्यातील कबड्डीपटू मुलीची हत्या झालेल्या कुटुंबियांना चंद्रकांत पाटलांकडून आर्थिक…
-
नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, पुढची कथा मी सांगणार – संजय राऊत