महाराष्ट्र सरकार माझ्या पतीच्या विरोधात काम करत आहे; क्रांती रेडकरचा मोठा खुलासा
मुंबई: “एनसीबीचे विभागीय संचालक तथा माझे पती समीर वानखेडे यांच्याविरोधात एक पूर्ण यंत्रणा काम करते आहे. पण मला विश्वास आहे की आरोप करणाऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. ते खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत. मागील 15 वर्षांचा रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर एकही आरोप नाही. अनेकांना त्यांच्या कामाचा त्रास होतोय. ज्यांना त्रास होतोय तीच लोकं समीर यांच्या पाठीमागे लागली आहेत”, असं समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या.
विविध प्रश्नांना उत्तर देत असलेल्या क्रांतीला यावेळी पत्रकारांनी ‘महाराष्ट्र सरकार समीर वानखेडे यांच्याविरोधात काम करतंय का?’ असा थेट प्रश्न विचारला. यावेळी क्रांतीने बेधडक उत्तर दिलं. ती म्हणाली, “होय त्यांच्याविरोधात एक विशेष यंत्रणा काम करतीय. पण मला खात्री आहे महाराष्ट्र सरकार खूप समजदार आहे. महाराष्ट्र सरकार सहकार्य करणारं आहे. विजय सत्याचाच होईल, असं काम महाराष्ट्र सरकार करेल. राज्य सरकार जरुर समीर वानखेडे यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभा राहिल ज्यावेळी त्यांना सत्य कळेल”
आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक आरोपांची राळ उडवून देत आहेत. मलिकांच्या आरोपांना आज क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.
Read Also :
-
जनाब संजय राऊत, तुम्हाला मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा…
-
2500 नागरिकांचे लसीकरण, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार, लहू बालवडकर यांच्या महा…
-
आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?
-
पुण्यातील हडपसर परिसरात बिबट्याची दहशत; नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन
-
अभिनेता झालो आणि सायन्समध्ये संशोधन करायचं राहून गेलं – दिलीप प्रभावळकर