आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात दोन आरोपींना जामीन मंजूर

27

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ज्या प्रकरणात आरोपी आहे, त्याच प्रकरणात काल दोघांना जामीन मिळाला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने मनीष राजगढिया आणि अवीन साहू या दोन आरोपींना (दि26) रोजी  जामीन मंजूर केला. राजगढिया हा या प्रकरणातील 11वा आरोपी असून त्याला एनसीबीने 2.4 ग्रॅम गांजासह अटक केली आहे. त्यांचे वकील अजय दुबे यांनी सांगितले की, मनीष राजगढिया याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. राजगढिया हा व्यावसायिक असून तो गोव्याहून मुंबईला येत असताना त्याला अडवण्यात आले. मनीषकडून 2.4 ग्रॅम गांजा सापडल्याचा आरोप होता. मात्र, त्याच्याकडून काहीही सापडले नसल्याचे पंचनाम्यात लिहिले आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एजन्सीच्या पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता. यादरम्यान क्रूझवरुन ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटसह अनेकांना क्रूझमधून ताब्यात घेण्यात आले. नंतर सर्वांना अटक करण्यात आली. या प्रकरणी एजन्सीने 20 जणांना अटक केली आहे.

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना ट्रायल कोर्टातून जामीन मिळालेला नाही. यानंतर आर्यनने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. बुधवारीही न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंमली पदार्थ विरोधी एजन्सी एनसीबीने जामिनाला विरोध करताना सांगितले की तो फक्त ड्रग्ज घेतो असे नाही तर तो अवैध तस्करीमध्येही सहभागी होता.

Read Also :

 

Get real time updates directly on you device, subscribe now.