आत्महत्या नव्हे ही तर हत्याच ! एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
पुणे: शेवगाव येथील एसटी डेपोमध्ये चालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसच्या शिडीला दोरी बांधून त्यांनी आपले जिवन संपवल्यामुळे राज्यात पुन्हा एकादा त्यांच्या पगाराचा विषय समोर आला आहे. आता यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्ये इतकंच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं प्रकरण भीषण आहे. हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही का ? आत्महत्या नव्हे तर ही सरकारी कारभारातून झालेली हत्या आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. दिलीप हरिभाऊ काकडे (वय 50 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. काकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा पुण्यात कंपनीमध्ये आहे, तर दुसरा मुलगा संस्थेमध्ये नोकरी करत असून मुलीचे लग्न झाले आहे.
Read Also :