नगर रूग्‍णालय अग्‍नितांडव : जिल्हा शल्य चिकित्सकांसह चार जण निलंबित तर दोन जणांची सेवा समाप्त

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. अखेर या दुर्घटनेप्रकरणी  जिल्हा शल्य चिकित्सकांसह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोन जणांची सेवा समाप्त करण्यात आल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

राजेश टोपे यांनी ट्वीट करून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोन स्टाफ नर्सची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

या सहा जणांवर कारवाई

1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित
2. डॉ.सुरेश ढाकणे-  वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी-  निलंबित
4.  सपना पठारे-  स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त
6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त