स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार; सुजय विखेंची टीका

7

अहमदनगर: सध्या जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केलीये. तसेच त्यांनी माहाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोनही नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारची कामगिरी जनता पाहात आहे. दोन वर्षांतील ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे भाजपाला पारनेर आणि कर्जत अशा दोनही मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे. कर्जतचे माजी  नगराध्यक्ष नामदेव राऊत राष्ट्रवादीत गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र विरोधकांचा अजून उमेदवारच ठरला नाही. रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याबद्दल जर जनतेला विश्वास वाटत असेल तर त्यांच्या उमेदवाराला निवडून द्यावे. मात्र त्यामुळे भविष्यात पश्चताप करण्याची वेळ येऊ शकते अशी टीका त्यांनी यावेळी केली.

विखे यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर पंचायत निवडणुकीमध्ये एकत्र येणार नाहीत. मात्र निवडणूक झाल्यावर एकत्र येतील जनतेने यांचा ढोंगीपणा लक्षात घ्यावा. हे सरकारच मुळात स्वार्थासाठी एकत्र आले आहे. ते आपसात भांडत असून, मुळ मुद्द्यापासून दूर पळतात. राज्यात वीजबिल, कोरोना, शेतकरी अनुदान असे अनेक प्रश्न आहेत. मात्र यातील एकही प्रश्न राज्य सरकारला मार्गी लावता आला नसल्याची देखील टिका त्यांनी यावेळी केली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.