‘केद्र सरकारला चर्चा नको म्हणून खासदारांचं निलंबन’, खा. सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर घणाघात

40

मुंबई: अधिवेशनात गोंधळ घातल्यानं राज्यसभेच्या 12 खासदारांचं  निलंबन करण्यात आलेलं आहे. दिल्लीत सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्यावेळी ही मोठी कारवाई करण्यात आलीय. निलंबन झालेल्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, आणि तृणमूलच्या काही खासदारांचा समावेश आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की सरकारला चर्चा नको म्हणूच या १२ खासदाराच निलंबन केल आहे, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच हा केद्र सरकारचा पळकुटे पणा आहे. देशात महागाईचा भडका उडाला आहे, सर्व सामान्य माणूस त्रस्त आहे. या सर्व प्रश्नाचे उत्तरे टाळण्यासाठीच बारा खासदाराच निलबन करण्यात आल आहे. असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाईंचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. पावसाळी अधिवेशनावेळी हा गदारोळ पहायला मिळाला होता.  12 ऑगस्टला संसदेत कागदपत्र फेकण्यापासून ते धरपकड होईपर्यंत हायव्हेल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता.  त्या गोंधळावर सर्वत्र टीका झाल्याचंही पहायला मिळालं. त्यानंतर खासदारांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला होता.

निलंबितांमध्ये काँग्रेस, शिवसेना, तृणमूलच्या खासदारांचा समावेश आहे. गोंधळ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या 6 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यात शिवसेनच्या 2 खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदारांवरील कारवाईनंतर आता काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.