कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबाद इथं निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून उद्योजक चंद्रकांत जाधव यांची थेट लढत झाली होती यामध्ये चंद्रकांत जाधव विजयी झाले होते.. जाधव हे स्वतः उद्योजक व्यवसायिक असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क त्या बळावर त्यांनी हा विजयी खेचून आणला होता.
आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव यांना मागील दीड वर्षात दोन वेळा कोरोना ची लागण झाली होती त्यातून ते बरे झाले होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आमदार जाधव यांना पोटात इन्फेक्शन झाले होते. हैदराबाद मधील रुग्णालयात त्यांच्यावर सोमवारी मोठी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती अशी माहिती समोर आली आहे.
जाधव यांचा कोल्हापुरातील अनेक तालीम मंडळ तसंच फुटबॉल खेळाडूंची मोठा थेट संपर्क होता. आमदार जाधव यांचे अचानक निधन झाल्याचे वृत्त मुळे नागरिकातून हळहळ व्यक्त होतयं कोल्हापूर मंगळवार पेठ इथं उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव दाखल होईल. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत सायंकाळी अंतिम संस्कार होईल असं निकटवर्तीयांनी सांगितले.