येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार- गुलाबराव पाटील

8

जळगाव: जिल्हा बँकेत आमच्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत, असा विश्‍वास शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यात महाविकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून मोठे यश मिळविले आहे. या यशामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील अशी चर्चा सुरू आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले की, जिल्हा बँकेवर शिवसेना, राष्ट्रवादी र्कांग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षाने एकत्रित यश मिळवून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे. पुढच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते सहा महिन्यात लागणार आहेत. त्यात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आहेत.

जिथे जिथे महाविकास आघाडी होईल, तिथे तिथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीमुळे आमचे बळ वाढलेले आहे, त्यामुळे येत्या जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार आहे, असे चित्र या जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

आम्ही तीन पक्ष एकत्र येणारच तुम्ही तीन पक्ष या निवडणुकीत एकत्र येवू शकणार काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यात तीन पक्षाचे सरकार येईल असे कुणाला वाटत होते का? परंतु तीन पक्षाचे सरकार आलेच ना! जिल्हा बँक निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आलेच ना मग जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत आम्ही नक्की एकत्र येऊ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.