एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला
जळगाव: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. चांगदेव येथून एका कार्यक्रमातून घरी येत असताना सूतगिरणी रस्त्यावर अज्ञातांनी हल्ला. रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडील आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. रोहिनी खडसे यांच्या घरी पोलिस पोहचले आहेत. तेथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
समोरची काच फेकण्यात आल्याने रोहिणी खडसे थोडक्यात वाचल्या आहेत. राजकीय डावपेचांतूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील व खडसे यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
याबाबत आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ट्विट केलंय. रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.